ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला फारसा लाभ होणार नाही – देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३: मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास फार लाभ होणार नसल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर मराठा बांधव ठाम आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर हे मोठं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यास मराठ्यांना तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल, त्याचा मराठा समाजाला ओबीसीमधील आरक्षणाने फार लाभ होणार नाही. याउलट मराठा समाजाला अर्थिक दुर्बल घटकातून ८ आरक्षणाचा लाभ देण्यात येतो. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर त्यांना फार काही लाभ नाही होणार. साडेतीन टक्केच आरक्षण मिळणार असल्याचं औपचारिकपणे फडणवीसांनी सांगितलं आहे.
तसेच अर्थिक दुर्बल घटकातून मराठ्यांना इतर सवलती मिळत आहेत. ओबीसींना १७ टक्के आरक्षण, त्यातच व्हिजेएनटी जातींना वेगळं आरक्षण मिळतं. ओबीसी प्रवर्गामध्ये ३५० जाती ओबीसीमध्ये आहेत. मराठा समाजाचा समावेश केल्यास ३५१ जाती होतील. मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण आहे ते ७ चे १० टक्क्क्यांपर्यंत असू शकतं, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्याचं पाहायला मिळालंय. मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीत दोनवेळा आमरण उपोषण केलं आहे. याच आंदोलनादरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचं समोर आलं होतं. लाठीचार्जनंतर हे आंदोलन राज्यभर चिघळल्याचं पाहायला मिळालं होतं.