फाशी देण्याच्या वक्तव्यावर जितेंद्र आवड यांच्या अडचणी वाढणार?

अमरावती, ९ मे २०२३ :द केरळ स्टोरी या चित्रपटावरून वाद-विवाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्याला फासा लटकवले पाहिजे असे प्रक्षेपक विधान केलेले आहे मात्र आता यावरून आवड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून आव्हाड्यांच्या वक्तव्यात बेकायदेशीर आढळले तर कारवाई करणार असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अमरावती येथे बोलताना उपमुख्यमंत्री व फडणवीस म्हणाले, “जितेंद्र आव्हाड जर असं बोलले असतील, तर ते अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे, विशेषत: हिंदू समाजात… हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”