आदित्य ठाकरेंना ताबडतोब वेड्याच्या दवाखान्यात दाखल करा – आरोग्यमंत्री तानाजी सावंत
सोलापुर, १० फेब्रुवारी २०२३ : “माझ्याकडे आरोग्य खात्यात चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरे त्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असल्याने त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ली मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू,” असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर वरळीतून माझ्याविरोधात लढा, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले. आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंत पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, शिंदे गटातील नेते तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. राज्यात चार वेड्याचे रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांत जागा असेल तर मी त्यांना रुग्णालयात पाठवण्यास तयार आहे, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत. ते आज (१० फेब्रुवारी) सोलापुरात माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.
याआधी तानाजी सावंत सोलापूरमधील गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मीच फाऊंडर आहे, असा दावा केला. “२०१९ साली मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते. माझ्यावर अन्याय का करण्यात आला, याचे मला उत्तर द्या, असा जाब मी मातोश्रीवर जाऊन विचारला होता. तसेच माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नसाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, असेही मी तेव्हा म्हणालो होतो,” असे तानाजी सावंत म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप