मी सकाळी कामाला सुरुवात करतो, काहीजण टाकायला जातात – अजित पवार यांचा टोला
नेवासा, ५ फेब्रुवारी २०२३: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का झालेला नाही? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
दरम्यान, या सभेत अजित पवार म्हणाले की, “आमदार प्राजक्त तनपुरे आणि माझे इतर सहकारी यांनी सांगितलं की, अजित पवार सकाळी-सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. पण त्यात काय वाईट आहे? काहीजण सकाळी सकाळी टाकायला सुरुवात करतात आणि मी कामाला सुरुवात करतो. हे वाईट आहे का? उगाच चंद्रावर जाऊन वाटोळं करण्यापेक्षा लोकांची कामं केलेली बरी. दरम्यान, अजित पवार हे बोलत असताना त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता यावरून चर्चा सुरू आहेत.”
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप