अखेर कसब्यातून काँग्रेस कडून धंगेकर रिंगणात

पुणे, ६ फेब्रुवारी २०२३:कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
काँग्रेसकडून अखेर माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धंगेकर हे आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

महाविकास आघाडीत काँग्रेसकडे कसबा मतदारसंघ असला तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता. पण परंपरेनुसार हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला. काँग्रेसचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी चर्चा करून तीन नावे अंतिम केली आहेत. ही तीन नावे दिल्लीला पाठवली जाणार असून, तेथे तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार होते. यामध्ये रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर या तिघांची नावे होती.
भाजपने शनिवारी हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली. याचवेळी कडून धांगेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याची अफवा उठली. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने उमेदवार जाहीर केले जातात गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी यावरून खाल सुरू आहेत. धंगेकरांचे नाव निश्चित झाले असते तरी अंतर्गत वादामुळे त्याची घोषणा केली जात नव्हती. आज सोमवारी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे पण उमेदवार कोण हे निश्चित नव्हते अखेर आज सकाळी धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.