पटोलेंसोबतचा वाद विकोपाला; बाळासाहेब थोरात यांनी दिला विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२३ :बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंपाला सुरवात झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला. यामध्ये तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ही निवडणूक झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी कसे राजकारण खेळले याची कागदपत्र दाखवून पोलखोल केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांची भूमिका मांडताना पटोले यांच्यावर कडाडून टीका केली. आम्हाला भाजपमध्येच ढकलण्याचा रचला होता असा आरोप करतानाच यापुढे पटोल्यांसोबत काम करणे शक्य नाही असे स्पष्ट केले होते. या घटनेस दोन दिवस उलटत नाहीत तोच आता बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळातील पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आमच्यापर्यंत आलेला नाही, ते आमच्याशी काहीही बोललेले नाही. ते आमच्या संपर्कात नाहीत. बाळासाहेबांचे पत्र दाखवा, तरच विश्वास ठेवेन, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच, भाजपला कॉंग्रेसमुक्त भारत करायचा आहे. म्हणून त्यांचे हे सर्व सुरु आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप