दलित पँथर ऑफ इंडियाचा पुणे बंदला पाठिंबा
पुणे, १३ डिसेंबर २०२२: भाजपचे मंत्री, पदाधिकारी, राज्यपाल यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. या विरोधात मंगळवारी पुणे बंद पुकारण्यात आला. त्यास दलित पँथर ऑफ इंडियाने पाठिंबा देत सक्रीय पाठिंबा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान मे पँथर मैदान मे अशा घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना सन्मानार्थ तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियारी विषारी यांचा धिक्कार करण्यासाठी दलित पँथर ऑफ इंडिया संघटनेने कडकडीत पुणे बंदचे समर्थन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले झिंदाबादचा नारा देत संघटनेचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पूसाहेब भोसले यांनी पुणे डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सलामी देत मूक मोर्चात सहभागी झाले.
या वेळेस दलित पँथर ऑफ इंडिया चे प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख, युवा आघाडीचे राहुल भोसले, सागर भालेराव , मेहबूब मणियार, राहील शेख आदी उपस्थित होते.