“पोटदुखी झालेल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू” – एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
ठाणे, २२ एप्रिल २०२३: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. येथे मोठं सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारलं जाणार आहे. राज्यातल्या विकासकामांमुळे पोटदुखी झालेल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्यात आला आहे, असा सणसणीत टोला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात वेगाने विकासकामं होत आहेत. म्हणून काही लोकांना पोटदुखी होत आहे. त्यांच्या पोटदुखीवर उपचार करण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून ठेवला आहे. या दवाखान्यांमध्ये सर्व इलाज मोफत केले जातील. आपण उभारत असलेल्या या नव्या रुग्णालयामुळे हजारो, लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. यासह आपलं सरकार आरोग्याच्या क्षेत्रात मोठं काम करत आहे. आपण रुग्णवाहिका वाटप करतोय, हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. परंतु आपल्या या कामांमुळे अनेकांना पोटदुखी होत आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत उपचार होतील. जनतेला सेवा पुरवणं हेच आपलं काम आहे.
तानाजी सावंतांना करणार होतो शिक्षण मंत्री
शिंदे सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे कायम वादामध्ये सापडेले असतात. त्यामुळे सरकारकडूनही सावध भूमिका घेतली जाते.
मंत्रीमंडळात स्थान दिल्यानतंर शिक्षण मंत्री केले जाणार होते. पण शिंदे यांनी केले नाही. याबाबत एकनाथ शिंदे कार्यक्रमात म्हणाले, ‘तुमच्या शैक्षणिक संस्थादेखील खूप आहेत. सुरुवातीला मी असा विचार केला होता की, तुम्हाला शिक्षमंत्री करायचं. पण मग ज्याच्या शिक्षणसंस्था जास्त त्याला शिक्षणमंत्री केलं तर कॉन्ट्रोव्हर्सी (वाद) होते. म्हणून तसं करता आलं नाही. सामान्य माणसाला सेवा देणारा हा आरोग्य विभाग आहे. तुम्ही या विभागात उत्तम काम करत आहात.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप