बच्चू कडू संतप्त – “मंत्रीपदासाठी पिशवी घेऊन बसलो नाही”

मुंबई, १२ जुलै २०२३ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपदाची मंत्री पदासाठी शपथ घेतली. अजित पवार गट सरकारमध्ये नव्याने सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आज नवनियुक्त मंत्र्यांना बंगले आणि दालनं मिळाली आहेत. मात्र, अद्याप रखडेला मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दरम्यान, रखडेलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्न विचारताच आमदार बच्चू कडू चांगलेच संतापले.
बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेना आमदारांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आले. मात्र, हा प्रश्न विचारताच त्यांनी प्रतिप्रश्न करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी बोलतांना बच्चू कडू म्हणाले, “कोणताही आमदाराला आस लावून बसलेला नाही. पण पत्रकारांना वाटते की आमदार मंत्रिपदाची आस लावून बसलेत. आम्ही काय पिशवी घेऊन बसलो आहोत का? वाटून टाकायला मंत्रिपद म्हणजे भाजीपाला आहे काय? मुळात कोणी पिशवी घेऊन बसणार आहे का? असे प्रतिप्रश्न करत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.

गेल्या आठवड्यात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले की, सहनशीलतेचीही एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली किंवा तुटली की, कोणीही कोणाचं नसतं. मी मंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिला नाही.

भाजपने अजित पवारांना सत्तेत सहभागी केल्यानं बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, नवीन घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या 40 आमदारांची बरीच गोची झाली आहे. हे आमदार दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडले आहेत. वर्षभरापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून भाजपला पाठिंबा दिला होता. आता अजित पवार पुन्हा निधी काढून घेतील, आमच्या निर्णयात हस्तक्षेप करतील, अशी भीती आमदारांना वाटत आहे. तसेच आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत, किमान राष्ट्रवादीला सोबत घेण्यापूर्वी चर्चा व्हायला हवी होती. पण तसे झाले नाही.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप