अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बबलू सोनकर

पिंपरी, १०/०२/२०२३: भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड शहरातील युवा कार्यकर्ता धर्मेंद्र ऊर्फ बबलू सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व सुधाकर भालेराव यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात सोनकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

धर्मेंद्र सोनकर हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे वडील ब्रिजलाल सोनकर हे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री होते. धर्मेंद्र सोनकर हे स्वतः राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (एससी कमिशन ऑफ इंडिया) महाराष्ट्र राज्य समन्वयक राहिले आहेत. दरम्यान, त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुण्यातील दलितांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यभर लढा दिला.

सोनकर हे सुरुवातीला कॉंग्रेसशी संबंधित होते.

लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक

धर्मेंद्र ऊर्फ बबलू सोनकर हे पिंपरी- चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सोनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. सोनकर यांचे राजकीय व सामाजिक कार्य आणि युवक व उत्तर भारतीयांचे संघटन लक्षात घेऊन भाजपने त्यांच्याकडे अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जात आहे.

म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे शहरातील उत्तर भारतीयांनी स्वागत केले आहे. नियुक्तीनंतर समाजातील दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा मानस सोनकर यांनी व्यक्त केला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप